Praj Company Fire : उरवडे येथील प्राज कंपनीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

उरवडे (ता. मुळशी) येथील प्राज कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Praj Company Fire
Praj Company Firesakal
Updated on

पिरंगुट - उरवडे (ता. मुळशी) येथील प्राज कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही आग शॅार्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग आत्ता आटोक्यात आलेली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या जवानांसह पाच गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे. आगीचे कारण व नुकसानीचे प्रमाण उद्यापर्यंत कळू शकेल.

आग लागली त्यावेळी कंपनीत सुमारे दहा ते अकरा कामगार कार्यरत होते. सुदैवाने जेवणाची सुट्टी झाल्याने काही कामगार जेवणासाठी कॅंटिनमध्ये तर काही कामगार अन्य ठिकाणी गेले होते. त्याचवेळी धुराचा लोळ तयार झाला होता.

बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. त्यावेळी कंपनीसमोरील नरेंद्र हेल्थ क्लबचे संचालक नरेंद्र मारणे यांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला. तसेच हिंजवडी व बावधन येथील अग्नीशमन केंद्राशी संपर्क साधल्याने अग्नीशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे आग आटोक्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com