कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला

सावता नवले
Thursday, 1 October 2020

केमिकल कंपनीत गुरूवारी ( ता. 1 ) पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागल्याने केमिकल ड्रमचे स्फोट व आगीचे मोठे लोट तयार झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीत गुरूवारी ( ता. 1 ) पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागल्याने केमिकल ड्रमचे स्फोट व आगीचे मोठे लोट तयार झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीमध्ये इतर कंपन्यांचे प्रक्रियेतून शिल्लक राहिले केमिकल वेगवेगळे करण्यात येणाऱ्या कंपनीत गुरूवारी ( ता. 1 ) पहाटे अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा व परिसरातील इतर कंपन्यांचे अग्निशामक बंब प्रयत्न चालू होते. आगीत केमिकलने भरलेल्या ड्रमचे वारंवार होणार स्फोट होत होते. तर आग व धुराचे लोट आकाशात उंच जात असल्याने वीस किलो मिटर अंतरापर्यंत आगीची भयानकता दिसून येत होती . कंपनीच्या परिसरात मोठयाप्रमाणात वेगवेगळया ज्वलनशील केमिकल ड्रमच्या साठयाला आग लागल्याने आग आटोक्यात आण्यास विलंब होत आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive fire at a chemical company in Kurkumbh MIDC Industrial Area