

40-Lakh ST Bus Reduced to Ashes, Driver Risks Life to Save Passengers
sakal
चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर: निरा–बारामती मार्गावरील खामगळपाटी (ता. बारामती) परिसरात गुरुवारी सकाळी धावत्या एसटी बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.