Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

आंबेगाव बुद्रूक येथील सदाशिव दांगट नगर परिसरात मंगळवारी एका पत्रावळ्या बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली.
pune fire

pune fire

sakal

Updated on

पुणे - आंबेगाव बुद्रूक येथील सदाशिव दांगट नगर परिसरात मंगळवारी (ता. १५) दुपारी एका पत्रावळ्या बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीने शेजारील इमारतीच्या तळमजल्यावरील चार सदनिकांसह टाइल्सच्या गोदामातील साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com