

JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
sakal
आंबेगाव : घर्र-घर्र करत जेसीबी आणि पोकलॅन येतात आणि डोंगरांच्या फुफ्फुसांवर घाव घालतात. त्यात निसर्गाचा मात्र जीव जातो. अशी गंभीर स्थिती दक्षिण पुणे परिसरातील जांभूळवाडी-कोळेवाडी आणि आंबेगाव खुर्द परिसरात निर्माण झाली आहे. हिरवाईने नटलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले जांभूळवाडी-कोळेवाडीचे डोंगर आज भूमाफियांच्या निर्दयी पंजात सापडले आहेत.