
Pune Local Elections
Sakal
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘महामेरू’ संस्थेने ‘सकाळ’च्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित केली आहे, तिला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या राज्यभरातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसह इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यात माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.