
पुणे : पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात होत असून लाखो गणेशभक्तांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिस दलाने जय्यत तयारी केली आहे. पोलिस कर्मचारी, होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या जवानांसह एकूण साडेआठ हजार जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.