सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावर सोमवारी (ता. ११) सकाळपासून पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शालेय वेळ, ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी अशातच रस्त्यावर खड्डे, बस बंद पडणे यामुळे वाहनचालकांना तासभर अडकून राहावे लागले..स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. आजच्या वाहतूक कोंडीमुळे ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर झाला..आज भयंकर अशी कोंडी होती, अशी प्रतिक्रिया वाहनचालक शेखर कुलकर्णी यांनी दिली. हिंगणे ते विश्रांतीनगर येथील प्रकाश इनामदार चौक यादरम्यान पेट्रोल पंपाच्या परिसरात रस्त्याला चेंबरचा मोठा खड्डा पडला होता..तसेच, शहराकडे जाणारी पीएमपी बसही बंद पडली होती. परिणामी काही वेळ कोंडी झाली. धायरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला वाहतूक कोंडी झाल्याने कालवा रस्ता, तुकाईनगर, दामोदरनगर, आनंद विहार कॉलनी यांना लागून जाणारा रस्ता अशा सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. माणिकबागेकडून विश्रांतीनगरच्या दिशेने नागरिक उलट्या दिशेने गाडी चालवत होते. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला..Pune Weather: ढगाळ वातावरणानंतर दुपारी कडक ऊन, संध्याकाळी पावसाची हजेरी; हवेत गारवा, तापमानात बदल नाही.वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांनी सांगितले की, सकाळी गर्दीच्यावेळी बस बंद पडणे आणि चेंबरचा खड्डा यामुळे वाहतूक कोंडी झाली तरी; हा खड्डा बुजविण्यासाठी पोलिसांनी काम केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.