

Green Cover Under Threat: 525 Trees Marked for Cutting in Pune
sakal
पुणे : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणात ५२५ हून अधिक वृक्ष अडथळा ठरत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे, त्यामुळे संबंधित वृक्षांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी पाऊल उचलण्यापूर्वीच सात हजारांहून अधिक नागरीकांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यावर सुनावणी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृक्षतोडीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.