
पुणे : गणित विषय म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि भुवया ताणल्या जातात. परंतु शालेय शिक्षणातील हा "गणित' हा विषय अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळाला तर? आश्चर्य वाटतंय ना!! पण आता हे शक्य आहे. एखादे अवघड गणित सोपे करून सांगायला हवे, ही गरज ओळखून एका सेवानिवृत्त प्राध्यापकांनी गणित सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा ध्यास घेतला आहे.
गणितासारखा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकविला गेला तर गणित हे संकट नव्हे तर संधी वाटू लागेल, अशी धारणा असणारे हे प्रा. जयंत खेडकर. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागातील ते सेवा निवृत्त प्राध्यापक आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उपयुक्त अशा गणित विषयातील नावीन्यपूर्ण पद्धती समजावून देण्याचा उपक्रम प्रा. खेडकर सध्या करत आहेत. यात विभाजकता, मसावि-लसावि, काटकोन त्रिकोण, मूळ संख्या, बैजिक समीकरणे अशी जवळपास वीस हुन अधिक पद्धती सोदाहरण त्यांनी समजावून दिल्या आहेत. याप्रकारे त्यांनी शंभरहून अधिक विशेष गणितांचा अंतर्भाव केला आहेत. खेडकर यांनीही सर्व गणिते सोडविण्याच्या सोप्या पद्धती आपल्या ब्लॉगद्वारे सर्वांसाठी खुल्या केल्या आहेत.
प्रा. खेडकर म्हणाले,""लॉकडाऊनच्या काळात बराच मोकळा वेळ उपलब्ध होता आणि मी इलेक्ट्रॉनिक्स सायन्सशी संबंधित असलो तरीही, सुरवातीपासून मला गणित विषयाची प्रचंड आवड होती. या आवडीमुळेच या मोकळ्या वेळात ही गणिते सोडविण्याच्या प्रकारावर विविध प्रयोग केले. सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गणित समाजावून सांगितल्यास, विद्यार्थ्यांना गणित हा विषय आपलासा वाटेल, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला.''
अशा पद्धतीने आतापर्यंत जवळपास बाराशेहुन अधिक गणिते सोप्या पद्धतीने सोडविली असून ती विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध केली आहेत. शिक्षकांना ही गणिते केवळ वाचून विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतील. त्याशिवाय विद्यार्थ्यांना स्वत: देखील ही गणितेही समजावून घेता येणार आहेत, असे प्रा. खेडकर यांनी नमूद केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.