

‘एमआयएम’ नगरसेवक
मतीन पटेल कारागृहात
गैरहजेरी भोवली; पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : ‘टीसीएस’ प्रकरणातील सहआरोपी तथा छत्रपती संभाजीनगर येथीलम ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांना न्यायालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले. ३१ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असूनही ते गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले. त्यानुसार शहर गुन्हे शाखेने गुरुवारी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल ‘टीसीएस’मधील धर्मांतर प्रकरण, महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांचा सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. निदा खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. चौकशीत मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाने ३१ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र पटेल गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्याची अंमलबजावणी करत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पुढील पाच दिवस त्यांना मध्यवर्ती कारागृहात राहावे लागणार असून मंगळवारी (ता.११) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
OLN26A14402
नाशिक : मतीन पटेल यास शुक्रवारी न्यायालयात हजर करताना पोलिस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.