Justice Served: 10 Convicted for 2017 Dhamane Triple Murder Case
तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यातील धामणे येथे २०१७ मध्ये घडलेल्या दरोड्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाने १० आरोपींना मंगळवारी (ता.१३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २५ एप्रिल २०१७ रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणे (ता.मावळ) येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या ११ जणांनी शेतावर राहणाऱ्या फाले कुटुंबातील तिघांच्या डोक्यात टिकाव,फावड्याचे घाव घालून निघृण हत्या केली होती.