Maval Lok Sabha
Maval Lok Sabhaesakal

Maval Lok Sabha: मावळ लोकसभेत विजय शिवसेनेचाच! पण, कोणत्या?  ५४.८७ टक्के मतदान सिद्ध करणार अस्तित्व

Maval Lok Sabha: मावळ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सलग तीन वेळा शिवसेनाचाच उमेदवार विजयी झाला आहे. आता चौथ्यांदा शिवसेना लढत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी (ता. १४) जाहीर केली. मंगळवारी सकाळपर्यंत सर्व मतमोजणीच्या ठिकाणी अर्थात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पोहोच झाली. एकूण ५४.८७ टक्के अंतिम मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. नाते-गोते आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी झालेली ही लढत पंतप्रधान मोदींसाठी मत मागितलेल्या भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सलग तीन वेळा शिवसेनाचाच उमेदवार विजयी झाला आहे. आता चौथ्यांदा शिवसेना लढत आहे. मात्र, प्रतिस्पर्धीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. निवडणूक आयोग व न्यायालयीन लढाईनंतर ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे यांना मिळाले. त्यामुळे ठाकरे यांना नवीन नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ व ‘मशाल’ चिन्ह घ्यावे लागले. त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी होती.

मात्र, राष्ट्रवादीमध्येही फूट पडून अजित पवार शिंदे यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षासोबत आले. त्यांची महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना मावळ मतदारसंघात रंगला. त्यातही दोन्ही शिवसेना पक्षांनी या जागेवर दावा केला आणि त्यात दोन्हीही अर्थात शिंदे व ठाकरे यांना यश आले. शिंदे यांनी विद्यमान खासदार बारणे यांना पुन्हा संधी दिली.

तर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले व लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना रंगला.

Maval Lok Sabha
Lalu Yadav : जहानाबाद लोकसभेच्या जागेवरुन लालू यादवांचं टेन्शन वाढलं; आरजेडीच्या बंडखोराचा उमेदवारी अर्ज...

महत्त्वाचे असे काही

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली. काही महिन्यातच शिवसेना व पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजपला साथ देत महायुतीत सामिल झाले
२०२४ च्या निवडणुकीत बारणे व संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत झाली.
महायुतीतील भाजपचे दोन व पाठिंबा दिलेला अपक्ष एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचा एक असे सहा आमदार, माजी मंत्री बाळा भेगडे व स्वतः विद्यमान खासदार या बारणे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे केंद्र शासनाच्याबाबतची नाराजी वाघेरे यांचे नाते-गोते व राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीची शरद पवार व उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती या जमेच्या बाजू.

Maval Lok Sabha
RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com