
Wadgaon Protest
Sakal
वडगाव मावळ : सध्या मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये वाढ करून किमान पेन्शन साडेसात हजार रुपये करावी, महागाई भत्त्यात वाढ करावी, पेन्शनधारक आणि त्यांच्या पती/पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवावी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुका इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी वडगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.