

Maval Ration Card Verification
ESakal
तळेगाव दाभाडे : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी शासन रेशनकार्डधारकांची पडताळणी मोहीम राबवित आहे. यात मावळ तालुक्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार रेशनकार्डधारक अपात्र ठरले आहेत.
नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळ या ग्रामीण भागांतील रेशनकार्डधारकांचीही तपासणी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पात्र कुटुंबांना रेशनकार्डच्या माध्यमातून शासन सवलतीच्या दरात धान्य देते. मात्र, काही लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना योजनेतून वगळण्यासाठी पात्रता पडताळणी सुरू आहे.