श्री पोटोबा महाराज उत्सव समिती जाहीर
वडगाव मावळ, ता. १९ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा उत्सव चैत्र पौर्णिमेला (२ व ३ एप्रिल) साजरा होणार असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, भास्करराव म्हाळसकर, ॲड. तुकाराम काटे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर्षीच्या उत्सवासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : महेंद्र म्हाळसकर, कार्याध्यक्ष : अतिश ढोरे, कार्यक्रम प्रमुख : बाळासाहेब तुमकर, शेखर वहिले, सुहास विनोदे, उपाध्यक्ष : गजानन भेगडे, अजय भवार, सुहास वायकर, उमेश ढोरे, सचिव : संदीप म्हाळसकर, सहसचिव : भूषण मुथा, खजिनदार : अनिल कोद्रे, सहखजिनदार : कुलदीप ढोरे व प्रवीण पाटोळे यांच्यासह अन्य सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

