मतदार यादी पुनरीक्षणामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

मतदार यादी पुनरीक्षणामुळे
अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक
Published on

तळेगाव दाभाडे, ता. २२ : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे मावळच्या तहसीलदारपदासाठी इच्छुकांमधील स्पर्धा सध्या थंडावली आहे.
विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या संभाव्य बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. महसूल विभागातील हे एक महत्त्वाचे पद मानले जात असल्याने या खुर्चीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. काही इच्छुक अधिकाऱ्यांनी त्यासाठी मुंबईच्या वाऱ्या सुरू केल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, राज्यात सध्या मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियान सुरू आहे. महसूल विभागातील अधिकारी या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या कामात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या कामावर कोणताही परिणाम होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे महसूल विभागातील अनेक प्रस्तावित बदल्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हे काम पूर्ण होईपर्यंत बदल्यांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे मुंबईत लॉबिंग करणाऱ्या इच्छुक अधिकाऱ्यांनाही प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com