पुण्यात कमाल तापमानाचा पारा ऑक्‍टोबर हिटकडे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

आकाश अंशतः ढगाळ राहत असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण ८२ टक्के असल्याने पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे - पुण्यात कमाल तापमानाचा पारा ऑक्‍टोबर हिटच्या दिशेने आता वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आकाश अंशतः ढगाळ राहत असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण ८२ टक्के असल्याने पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील शिवाजीनगर वेधशाळेत १ जूनपासून आतापर्यंत ७९४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे ७९३.१ आणि पाषाण येथे ७५५.८ मिलिमीटर पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maximum temperature in Pune is now rising towards the October hit