...म्हणून अरण्येश्वर परिसरात महापौर व आयुक्तांचा करण्यात आला निषेध

nishedh1.jpg
nishedh1.jpg

सहकारनगर (पुणे) : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने आंबिल ओढ्याला पूर येऊन नाल्याकडेला असलेल्या झोपडपट्टी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. म्हणून यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येथील नाल्याची पाहणी करण्यासाठी शनिवारी दुपारी एक वाजता मनपा आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहळ यांनी भेट देऊन आंबिल ओढ्याची पाहणी केली.

यावेळी नाल्याकडेला असलेली अतिक्रमण हटवून नाल्याची रुंदीकरण करण्याची सूचना महापौर व आयुक्तांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,  नगरसेवक आबा बागुल,  नगरसेवक महेश वाबळे, सुभाष जगताप, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, उपायुक्त जयंत भोसेकर, सहाय्यक आयुक्त के. बी. लखाने, योगेश वाबळे, मंगेश शहाणे इ. उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंबिल ओढ्या कडेला असलेली नाला गार्डन काढून 22 मीटर नाल्याची रुंदीकरण करून नाले साफ करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

अप्पर इंदिरानगर, गुरुराज सोसायटी, मोरे वस्ती, ट्रेझर पार्क, टांगेवाला कॉलनी, अण्णा भाऊ साठे वसाहत संतनगर, तावरे कॉलनी, बागुल उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, लक्ष्मी नगर, दांडेकर पूल इ. भागात 25 सप्टेंबरला आलेलेया पुराने घरांचे मोठे नुकसान होऊन अनेकांची घरे पडली. संसार उध्दवस्त झाले तर अनेकांना जीव गमवावा लागला. जीवितहानी बरोबर वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती.या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजता आंबिल ओढा जवळ असलेल्या ट्रेझर पार्क नाल्याची पाहणी महापौर मुरलीधर मोहळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली आहे. .

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी  आंबिल ओढ्यावरील नाले साफसफाई, अतिक्रमणे हटवणे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सत्ताधारी महापालिका अपयशी ठरत असलायचा आरोप नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला आहे. तसेच महापौर व आयुक्तांनी अरण्येश्वर मंदिर येथे थांबलेल्या पूरग्रस्त नागरिकांची समस्या जाणून घेण्यास आले नसल्याने महापौर व आयुक्त यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त केला. यावेळी पर्वती राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, कार्याध्यक्ष दिलीप अरूंदेकर इतर नागरीक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com