Khadakwasla Crime : एमबीबीएस‌’ला प्रवेश मिळवून देतो सांगत २७‌ लाखांची फसवणूक

वैद्यकीय शिक्षणात अग्रेसर असलेल्या एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देतो. असे सांगून २७‌ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा‌ गुन्हा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात‌ दाखल केला आहे.
fraud
fraudesakal

खडकवासला - वैद्यकीय शिक्षणात अग्रेसर असलेल्या एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देतो. असे सांगून २७‌ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा‌ गुन्हा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात‌ दाखल केला आहे.

याप्रकरणी जयेश शिंदे, पवन सुर्यवंशी, (रा. चिखली, पुणे मुळगाव रा. हंगरगा, ता.निलंगा, जि. लातुर) व‌ राहुल तुपेरे ल यांच्या विरुद्ध संगणमताने लुबाडून फसवण्याचे उद्देशाने पैशांचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली.

महेंद्र देशमुख, (वय- ५९, रा- वारजे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख यांना वरील तिघांनी प्रवेश मिळवून देतो‌. असे सांगून एप्रिल २०२३ पासून ‌२७ लाख २६ हजार रुपये घेतले. परंतु अद्याप प्रवेश मिळाला नाही. फिर्यादीस लुबाडून फसवण्याचे उद्देशाने पैशांचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. फौजदार जवळगी अधिक तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com