esakal | 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : सराफी व्यावसायिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ऍड.दिप्ती सरोज काळे या वकिल महिलेने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. काळे हिच्यासह निलेश उमेश शेलार यांच्याविरुद्ध "मराठे ज्वेलर्स'चे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी काळे हिला तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान, काळे हिने न्यायालयीन कोठडीत असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी ती कोरोनाबाधीत आढळल्याने तिच्यावर ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा: सराफी व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह साथीदाराविरुद्ध 'मोक्का'

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळे ही तेथील स्वच्छतागृहामध्ये गेली. त्यानंतर तेथील ती 20 ते 25 मिनीटे बाहेर पडली नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा काळे हिने स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा काढून आठव्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी काळे व तिच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली होती. काळे तिच्या साथीदारांनी मागील दहा वर्षांपासून कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्याद्वारे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतर आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात 'मोक्का' अंतर्गत कलमांचा समावेश करावा, असा प्रस्ताव विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्या मार्फत पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. डॉ.शिंदे यांनी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर संबंधीत गुन्ह्यात 'मोक्का' अंतर्गत कलमांचा समावेश करण्यास मंजुरी दिली होती.

loading image