मंचर - येथील उपजिल्हा रुग्णालयात मुक्कामी थांबणाऱ्या रुग्णांना दररोज मिळणारा नाश्ता, चहा व दोन वेळचे भोजन मंगळवार (ता. १९) पासून बंद होणार आहे. जेवण पुरवठा करणाऱ्या रेणुका महिला बचत गटाचे तब्बल आठ लाख रुपये थकले असून, या कामाचे मुख्य ठेकेदार कैलास फुड्स (सातारा) गेल्या महिनाभरापासून फोनही उचलत नाहीत.