
पुणे : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाच्या वाढत्या संख्येबाबत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी संसदेत लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सत्रात महिलांमधील वाढत्या कर्करोगाबाबत चिंता व्यक्त करत कर्करोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.