Video : सर्व पक्षांकडून ऑफर, पण भाजपचा फोनही नाही; मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर

सागर आव्हाड
Wednesday, 2 October 2019

इतर पक्षाची ऑफर आली, पण भाजपमधून अजून कोणाचाही फोन आला नाही. त्यांचा फोन आता येईल असा विश्वास त्यांना आहे. नागरिकांनी अपक्ष उभा राहा अशी मागणी केली आहे. मात्र मी उभी राहणार नाही.

Vidhan Sabha 2019 : पुणे : पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि राजू शेट्टी पक्षाकडून ऑफर आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारल्यानंतर त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी आणि मनसे यांच्याकडून ऑफर आल्याचे सांगत भाजपने साधा फोनही केला नसल्याचे सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले. कोथरूडमध्ये आज (बुधवार) चंद्रकांत पाटील मेळावा घेत आहेत. पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचाही विरोध आहे.

तिकीट नाकारल्यानंतर साम वाहिनीशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की इतर पक्षाची ऑफर आली, पण भाजपमधून अजून कोणाचाही फोन आला नाही. त्यांचा फोन आता येईल असा विश्वास त्यांना आहे. नागरिकांनी अपक्ष उभा राहा अशी मागणी केली आहे. मात्र मी उभी राहणार नाही. आपण पक्षाचे एकनिष्ठ असून, चंद्रकांतदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medha Kulkarni disappointed for not gives candidateship in Kothrud