
पुणे : महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) ६२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन आणि इतर थकीत रक्कम योग्यरीत्या मिळावी, त्यासाठी केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.