Warje PMP Bus Stop: वारजेतील पीएमपी बसथांब्यावर साचलेला राडारोडा 'सकाळ'च्या बातमीनंतर हटवण्यात आला. आरोग्य निरीक्षक प्रशांत दामले यांनी पथकासह परिसराची स्वच्छता केली.
वारजे : सकाळ वृत्तपत्रात ‘पीएमपी बसथांब्यावर प्रवाशांची परवड’ अशा मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेऊन येथील राडारोडा स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.