esakal | पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय
sakal

बोलून बातमी शोधा

Medical-College

पुणेकरांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासह महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे वर्ग मंगळवार पेठेतील सणस शाळेत भरणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होणार आहे.

पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासह महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे वर्ग मंगळवार पेठेतील सणस शाळेत भरणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या वर्षी शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी (प्रात्यक्षिक) महापालिकेचे दळवी आणि फुरसुंगीतील रुग्णालय निश्‍चित केले आहे. विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय औंधमधील महापालिकेच्या इमारतीत राहील. सणस शाळेत सुसज्ज वर्ग खोल्यांसह त्या ठिकाणी तीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष काम हाती घेण्याचे नियोजन आहे. महाविद्यालयाचे वर्ग भरणाऱ्या इमारतींसह सरावासाठीच्या रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी आरोग्य खात्याचे पथक दोन दिवसांत पुण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

आईच्या मित्राकडुनच जिवे मारण्याची धमकी देत बारा वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाची पहिली बॅच येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शिफारस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्य सरकारला नुकतीच केली आहे. त्यादृष्टीने पायाभूत कामे हाती घेण्याची तयारी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केली आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

डिसेंबरमध्ये "अच्छे दिन'ची आस; हॉटेल व्यावसायिक प्रतीक्षेत 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून पहिल्या वर्षीपासून पुणेकरांना सामावून घेतले जाणार आहे. या काळातही त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी,यासाठी नव्या गावातील म्हणजे फुरसुंगीतील रुग्णालय निश्‍चित करीत आहोत.
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पदवीधर-शिक्षक निवडणूक :आजी-माजी मंत्री मैदानात उतरणार 

नव्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे पुणेकरांसाठीची आरोग्य व्यवस्था व्यापक होणार आहे. त्यासाठी पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थी आणि महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक तेवढ्या सुविधा उपलब्ध करू.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Edited By - Prashant Patil

loading image
go to top