
वाघोली - औषध दुकानाबाहेर गोंधळ घालणाऱ्यांना इथे गोंधळ घालू नका असे म्हणल्याने चौघांनी आत येवून दुकान मालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करत दमदाटी केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास केसनंद फाट्यावर घडला. या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा लोणीकंद पोलिसात दाखल करण्यात आला आहे.