Grief in Baramati: बारामतीत वैदयकीय पदवीच्या तिस-या वर्षामध्ये शरयू शिकत होती. अत्यंत हुशार विद्यार्थीनी म्हणून तिचा नावलौकीक होता. काही वर्षांनंतर जी डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणार होती तिचाच दुर्देवी मृत्यू महाविद्यालयातील अनेकांना चटका लावून गेला.
Scene of the Baramati accident where a medical student lost her life after a bike hit a divider.Sakal
बारामती: शहरातील भिगवण रस्त्यावर उर्जा भवननजिक गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा दुर्देवी अंत झाला. शरयू संजय मोरे (वय 22) हिचा या अपघातात मृत्यू झाला.