मेडिक्‍लेम पॉलिसीधारकांनो, कोरोनाच्या उपचारासाठी 'क्लेम' करायचा आहे? वाचा 'ही' महत्त्वाची बातमी

Mediclaim policy holders can Claims for treatment of Covid-19
Mediclaim policy holders can Claims for treatment of Covid-19
Updated on

पुणे : विमाधारकांनो, कोरोनाच्या उपचारासाठी केलेला खर्च परत मिळण्यासाठी क्‍लेम केला, तर त्यांना तो खर्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे मेडिक्‍लेम पॉलिसी विमाधारक असलेल्या आणि कोरोनाबाधित रुग्णांना काही प्रमाणात यामुळे दिलासा मिळणार आहे. 

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

मेडिक्‍लेम पॉलिसीमध्ये "व्हायरल इन्फेक्‍शन' झाल्यास त्यांची भरपाई देण्याची तरतूद आहे. कोविड- 19 हे व्हाययल इन्फेक्‍शन आजार आहे. त्यामुळे अशा पॉलिसी असलेल्या विमाधारकांना कोविड-19 च्या आजारावर झालेला खर्च क्‍लेम केल्यानंतर मान्य करता येईल, असे आदेश प्राधिकरणाने काढले आहेत. त्यामुळे तुम्ही या आधीच ही मेडिक्‍लेम पॉलिसी काढली आहे. अन्‌ तुम्हाला कोविड-19 ची बाधा झाली आहे. त्यासाठी तुमचा जो खर्च झाला असेल, तो परत मिळविण्यासाठी क्‍लेम करता येणार आहे, असे ग्राहक पंचायतीचे न्यायप्रधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले. 

आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंग ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, अमोल कोल्हे यांची भूमिका

तसेच जर नवीन मेडिक्‍लेम पॉलिसी तुम्ही काढली असेल अथवा काढणार असेल. तर त्यांना देखील याचा फायदा होऊ शकणार आहे. मात्र पॉलिसी काढल्यानंतर तीस दिवसांच्या वेटींग पिरियड त्यासाठी देण्यात आला आहे. म्हणजे पॉलिसी काढलेल्या दिवसापासून तीस दिवसानंतर तुम्हाला कोविड-19ची लागण झाली आणि त्यावर उपचार घेण्यासाठी आलेल्या खर्च परत मिळविण्यासाठी क्‍लेम करता येणार आहे, असे विमा एजंट कैलाश पोकळे यांनी सांगितले. 

सासवडमध्ये आढळला आणखी एक कोरोनाबाधित 

पुणे शहरात दर शंभर माणसांमागे 15 ते 20 टक्के मेडिक्‍लेम पॉलिसी काढणाऱ्यांचे प्रमाण आहे. शहरात सर्वाधिक बाधित रुग्ण हे झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. तेथे ही पॉलिसी काढणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी आहे, असेही जोशी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. धक्कादायक! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com