धनगर समाज आंदोलनाची नियोजन बैठक

ज्ञानेश्वर भंडारे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड मध्येही या आंदोलनाचे आयोजन सकल धनगर समाजाकडून करण्यात आले आहे. याची नियोजन बैठक वाल्हेकर वाडी येथे पार पडली.

यावेळी धनगर समाजाच्या मागण्या व निवेदन देण्याचे ठरविणात आले. धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबत या सरकारने सतत टाळाटाळ केली. वेळकाढूपणा केला. यावेळी सकल धनगर समाजकडून पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनाची सुरूवात अहिल्यादेवी चौक पिंपरी येथुन होणार असून, शगुनचौक, काळेवाडी पुलावरुन पाचपीर चौक, आठवण हॉटेल समोरुन चिंचवड गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पुलावरुन केशवनगर मार्गे चिंचवडगाव चापेकर चौक, तेथुन चिंचवडे नगर मार्गे, वाल्हेकर वाडी- बिजलीनगर पुलावरुन आकुर्डी तहसील कार्यालया समोर समारोह होणार आहे.

यावेळी राजू दुर्गे, विना सोनवलकर, श्रीकांत धनगर, राजेंद्र घाडगे विनोद बरकडे, राहुल मदने, बालाजी कोपनर, गीतराम महानवर, सागर वायकुळे अभिषेक माने, आकाश कोपनर, महेश कोपनर, किरण वाघमोडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting of the Dhangar community agitation