
Ayush Komkar killed case
Esakal
पुणे - आंदेकर-गायकवाड टोळी युद्धातून घडलेल्या आयुष गणेश कोमकरच्या खूनापुर्वी आरोपी हे वानवडी परिसरात एकत्रित जमले होते. त्यांची बैठक झाली. आरोपी एकमेकांना मोबाईल घरी ठेवून भेटत होते. या आरोपींनी गोळीबाराचा सराव कुठे केला आहे, याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.