दस्तनोंदणीबाबत मंत्रालयात बैठक घेऊन विषय मार्गी लावणार; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde and ramesh konde

पुणे शहरालगत लगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी सध्या बंद आहे.

दस्तनोंदणीबाबत मंत्रालयात बैठक घेऊन विषय मार्गी लावणार; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

खडकवासला - अनधिकृत बांधकामांबाबतची दस्तनोंदणी (खरेदी विक्री) सुरू करण्याविषयी लवकरच मंत्र्यालयात पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी 'इ सकाळ'शी बोलताना दिली.

शहरालगत लगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी सध्या बंद आहे. ती सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज शनिवारी विमानतळ पुणे लोहगाव विमानतळावर भेट घेतली. यामध्ये स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांनी एकत्र येऊन काही बांधकामे केलेले आहेत. ती बांधकामांची दत्त नोंदणी विक्री होत नसल्यामुळे ते बांधकाम व्यावसायिक मोठ्या अडचणीत आलेले आहेत. व्याजाने ते मेटाकुटीला आलेले आहेत अशा या आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दस्त नोंदणी खरेदी-विक्रीचा तातडीने सुरू करावी अशी मागणी निवेदनातून केली होती.

यावेळी दस्तनोंदणी बंद असल्याने सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत रमेश कोंडे यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले तर संदीप खर्डेकर यांनी न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसताना महसूल खात्याने दस्तनोंदणी बंद ठेवली आहे. त्यामुळे छोटी घरं खरेदी केलेले सामान्य नागरिक अडचणीत आले असल्याचे सांगितले. यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल व दस्तनोंदणी सुरु करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

बांधकाम व्यावसायिक स्थानिक भूमिपुत्र आहेत. तर घरे घेणारी लोक देखील सामान्य नागरिकांनी मध्यमवर्गीय आहे. या विषयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे दोन्ही वर्गाला न्याय देता येईल. असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दी लगत असलेल्या गावांना बांधकामाचे अनेक बंधन आहेत. त्याबाबत देखील रमेश कोंडे यांनी निवेदन दिले.

यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहर प्रमुख प्रमोद भानगिरे उपजिल्हाप्रमुख अण्णा दिघे उपशहर प्रमुख निलेश गिरमे युवासेनेचे निलेश घारे, तेजस पाबळे, उमेश होले पदाधिकारी तसेच भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, बांधकाम व्यावसायिक सारंग राडकर, बाजार समितीचे माजी संचालक राहुल घुले, माजी उपसरपंच सुभाष नाणेकर, अतुल धावडे, दत्ता मारणे, सुभाष शिंदे, किरण वांजळे, निलेश काळभोर, काका खवले, सतीश वांजळे, बागी धावडे, राहुल वांजळे उपस्थित होते.