जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी: सिंचन भवन पुणे येथे बैठक 

Meeting at Sinchan Bhavan Pune Irrigation works will be started in Junnar taluka
Meeting at Sinchan Bhavan Pune Irrigation works will be started in Junnar taluka
Updated on

नारायणगाव : ''जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पा अंतर्गत सिंचन प्रकल्पासंबंधीत विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सिंचन भवन पुणे येथे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समावेत बैठक घेण्यात आली. या वेळी प्रलंबित कामे प्राधान्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला''अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
 


बैठकीला कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, एस. जे.माने, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, सुचेता डुंबरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, प्रदीप पिंगट, अशोक घोडके, सुरेश तिकोणे आदी उपस्थित होते. 

आमदार बेनके म्हणाले या वेळी चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तवाला प्रशासकीय मान्यता घेऊन शेतकऱ्यांना सिंचनाचा जास्तीत जास्त लाभ देणे, माणिकडोह धरणातील आठ बुडीत बंधाऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात चावंड, जळवंडी, अंजनावळे या तीन बुडीत बंधाऱ्यांची कामे तांत्रिक मान्यता घेऊन सुरू करणे. पिंपळगाव जोगा कालव्याची दुरूस्ती करून शेतकऱ्यांना जा-ये करण्यासाठी पुल बांधणे, कालव्याच्या वितरीका व लघु वितरीका, नवीन 'आऊट लेट' आदी कामे करणे. ओतूर येथील वाघदरा लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करणे.पिंपळगाव जोगा कालवा व चिल्हेवाडी पाईप लाईन यांचे प्रलंबित भूसंपादनचे पैसे शेतकऱ्यांना देण्या बाबतचा कृती आराखडा तयार करणे,दुरुस्ती करून कुकडी डावा कालवा गळती थांबविणे, झाडे झुडपे काढणे, दळणवळणासाठी काही ठिकाणी कालव्यावर पुल बांधणे, सीआर गेट स्थापन करणे, यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी मंजूर निधीतून कामे सुरू करणे आदी बाबत या वेळी चर्चा करण्यात आली.


 
आमदार बेनके म्हणाले, ''रामजेवाडीच्या आऊट लेट च्या कामासाठी व निरगुडे, बेलसर कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. बेल्हे येथील प्रस्तावित 'एस्केप' व 'सीआर गेट'चे काम त्वरीत सुरु करण्याबाबत, चिल्हेवाडी 'पाईप लाईन' लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सुचविण्यात आलेले सकारात्मक बदलास कार्यकारी संचालक राजपुत यांनी या वेळी मान्यता दिली.''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com