Maharashtra Police
sakal
पुणे - मुंबईच्या धर्तीवर आता पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. पुणे पोलिसांसाठी चार हजार सदनिकांची ‘मेगा टाउनशिप’ उभारण्याचे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी केलेल्या महत्त्वाकांक्षी घोषणेनंतर पुण्यातील या प्रकल्पालाही तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे पुणे पोलिसांना सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी घरे लवकरच मिळणार आहेत.