
"Melodies That Tell Stories: The Evergreen Songs of Ashtai"
Sakal
ऋचा थत्ते- rucha19feb@gmail.com
कपाट लावता लावता आशाताईंच्या सदाबहार स्वरातील गाणी ऐकत होते आणि गुणगुणतही होते; पण तुमचं लक्ष कधी कोणत्या गोष्टीकडे वेधलं जाईल सांगता येत नाही. आताही तसंच झालं. ‘भरजरी गं पितांबर’ हे गाणं संपलं आणि ‘एका तळ्यात होती’ हे गीत सुरू झालं आणि अचानक लक्षात आलं, की ही दोन गाणी म्हणजे सुरेल गोष्टीच आहेत. गाण्यात गुंफलेल्या गोष्टी. अत्यंत संस्कारक्षम असा ठेवा आहे हा!