बारामती मेडीकल कॉलेज व अँस्ट्राजेनिकामध्ये सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती मेडीकल कॉलेज व अँस्ट्राजेनिकामध्ये सामंजस्य करार

बारामतीतील शासकीय सर्वोपचार रुग्णालय व वैदयकीय महाविद्यालय तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची अँस्ट्राजेनिका कंपनीच्या वतीने या तपासण्या केल्या जाणार आहेत.

बारामती मेडीकल कॉलेज व अँस्ट्राजेनिकामध्ये सामंजस्य करार

बारामती - कोविडनंतर काही जणांमध्ये फुफुसाच्या कर्करोगाचे (Lungs Cancer) निदान झालेले होते, हीच बाब विचारात घेत कोविड (Covid) काळात ज्यांचे एक्स-रे (X-Ray) काढलेले होते, अशा रुग्णांच्या एक्स रे वरुन विविध तपासण्या करण्याचा निर्णय झाला आहे.

बारामतीतील शासकीय सर्वोपचार रुग्णालय व वैदयकीय महाविद्यालय तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची अँस्ट्राजेनिका कंपनीच्या वतीने या तपासण्या केल्या जाणार आहेत. या दोन संस्थांदरम्यान नुकत्याच एका सामंजस्य करारावर सह्या केल्या गेल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार, अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे तसेच डॉ.संतोष भोसले यांच्या पुढाकारातून हा करार झाला आहे. अँस्ट्राजेनिका यांच्या वतीने डॉ. अजय शर्मा यांनी तर मेडीकल कॉलेजच्या वतीने डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी या करारावर सह्या केल्या.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने या तपासण्या केल्या जाणार आहेत, याचा उपयोग कोविड झालेल्या रुग्णांना होणार आहे. एक्स रे वरुन विविध तपासण्या करण्यासाठी अँस्ट्राजेनिकाची टीम बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यलयास मदत करणार आहे. याचा उपयोग बारामतीसह पंचक्रोशीतील रुग्णांना होणार आहे. या प्रसंगी डॉ. संतोष भोसले, डॉ. अमोल शिंदे, डॉ. राजेश उमाप, डॉ. शारदा राणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

तपासणीमुळे लवकर निदान शक्य....

कोविडपश्चात अनेक जण तपासण्या करत नाहीत, त्या मुळे या तपासणीमध्ये ज्यांच्या एक्सरे मध्ये काही वेगळ्या बाबी आढळतील, त्यांच्या अधिकच्या तपासण्या केल्या जाणार आहेत, त्याने काही असाध्य रोग असतील तर त्याचे निदान वेळेवर होऊ शकेल.