बारामतीतील शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण; कृषी संशोधनासाठी जिल्हा बॅंक देणार 'एवढे' कोटी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी आज (या.१३) ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश नुकताच या ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. ट्रस्टचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी हा धनादेश स्विकारला. यावेळी थोरात यांच्यासह बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबत बॅंक आणि या ट्रस्टमध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार या ट्रस्टमार्फत कृषी वैज्ञानिक संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा बँकेच्यावतीने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी आज (या.१३) ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश नुकताच या ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. ट्रस्टचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी हा धनादेश स्विकारला. यावेळी थोरात यांच्यासह बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

डेटिंग साईटवर 'त्याची' चार अकाउंट्स; आयटीतील तरुणींना 'तो' ओढायचा जाळ्यात
थोरात म्हणाले,"बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत जलसंवर्धनासाठी जलजागर व जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आता या ट्रस्टमार्फत कृषी वैज्ञानिक संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रामार्फत कृषी संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि विस्तार प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी विविध प्रकारचे १७ प्रशिक्षण मॉडेल विकसित करण्यात आले आहेत. या प्रत्येक मॉडेलमध्ये प्रत्येकी प्रशिक्षण सत्र असणार आहेत. पुढील तीन वर्षांत जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memorandum of Understanding between Agriculture Development Center and District Bank at Baramati