पुणे - शौर्य, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि महान मराठा सेनानी महादजी शिंदे यांचा इतिहास आता अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातही चिरस्थायी स्वरूपात झळकणार आहे. न्यूयॉर्कमधील नामांकित पर्यटनस्थळी हे पुतळे उभारण्याची तयारी सुरू असून, संपूर्ण मराठी जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.