पुणे : विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Married Women abused

पुणे : विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ

आळेफाटा - पल्लवी अभिजित वाव्हळ (वय २८ नारायणगाव पाटे अळी, ता. जुन्नर) या उच्चशिक्षित विवाहितेला पाच लाख रूपये माहेरहून घेऊन येण्यास सांगितले. पैसे न आणल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस ठाण्यात पती,सासु सासरे व दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ता. १२ एप्रिल २०१६ रोजी अभिजीत रविंद्र वाव्हळ (रा आळेफाटा) यांच्यासोबत पल्लवी यांचा नारायणगाव येथे विवाह झाला. सुरुवातीला दोन महिने सर्वांनी व्यवस्थित नंदाविले. त्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. पैसे न आणल्याने सासरचे शिवीगाळ करून मारहाण करत होते. उपाशी ठेवत होते.

जून २०१६ मध्ये सासरच्यांनी पल्लवीला घराबाहेर काढले. यासर्व जाचाला कंटाळून पल्लवीने राजगुरुनगर कोर्टात पोटगीसाठी दावा दाखल केला. हे समजल्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये दावा माघे घेण्यासाठी कोंडीभाऊ शंकर खोंड व सुनंदा कोंडीभाऊ खोंड (दोघे रा.पिंपळवंडी ता.जुन्नर) यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. पल्लवी वर दबाव आणण्याचा अतोनात प्रयत्न केला.या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी पल्लवी यांचे पती अभिजीत रवींद्र वाव्हळ, सासरे रविंद्र चंद्रकांत वाव्हळ, सासु श्रध्दा रविंद्र वाव्हळ, दिर अभिषेक रविंद्र वाव्हळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस करत आहेत.