मेफेड्रोनची विक्री करणाऱ्यास भवानी पेठेतून अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

स्वामी समर्थ चौकाकडून डावरे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जय भवानी हॉटेल समोर खान याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्याला सुरवातीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असते त्याने एमडीची विक्रीला आल्याची कबुली दिली.

पुणे : मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) पकडले. भवानी पेठ भागात सापळा लावून संशयितास अटक करण्यात आली. तपास केला असता त्याच्याकडून 62 हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आसिफ युसूफ खान (वय 36 वर्षे रा. 49, भवानी पेठ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात एनडीपीएस ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठेत एक व्यक्ती मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री करीत आहे, अशी माहिती पथकास मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक ढेंगळे, पोलिस हवालदार राहीगुडे, बोमादंडी, पोलिस नाईक साळुंखे, शिंदे, दळवी आणि छडीदार यांनी सापळा लावला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वामी समर्थ चौकाकडून डावरे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जय भवानी हॉटेल समोर खान याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्याला सुरवातीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असते त्याने एमडीची विक्रीला आल्याची कबुली दिली. त्याकडून 370 ग्रॅम मिली ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी खान आणि मुद्देमाल खडक पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mephedrone seller arrested from Bhavani Peth