
वाघोली : शहरात नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांचा वेळ वाचविण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली. नागरिक या मेट्रोचा वापरही करू लागले आहे. नोकरदार दररोज मेट्रोने ये-जा करीत आहेत, मात्र मेट्रो स्थानकाजवळ पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजाने पदपथावर वाहने लावावी लागतात. परंतु वाहतूक पोलिस या वाहनांवर कारवाई करीत असल्याने नोकरदार संकटात सापडले असून वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.