डिसेंबर महिना मेट्रोला लाभदायक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ फोडलेल्या शहरातील पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मेट्रो प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यातच मेट्रोची ‘ट्रायल रन’ होणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी डिसेंबर लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत. 

सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाचे २६ डिसेंबर २०१६ रोजी मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. त्यानंतर मेट्रोची कंपनी स्थापन झाली.

कामांना सुरवात झाली. सध्या शहरातील मेट्रो प्रकल्पात २५०० कर्मचारी काम करीत आहेत. पिंपरी-स्वारगेट मार्गाचे ४० टक्के, तर वनाज-रामवाडी मार्गाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांत मेट्रो प्रकल्पावर शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. शहरातील भुयारी मेट्रोचे काम सुरू झाले आहे. आता बोगदा खोदण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

मेट्रोसाठी संरक्षण खात्याकडून नगर रस्त्यावरील भूसंपादन आणि याच रस्त्यावरील मेट्रोची अलाईनमेंट निश्‍चित झालेली नाही. महापालिका आयुक्तांनी तिला मंजुरी दिल्यास नगर रस्त्यावरील कामही वेगाने होऊ शकते.

वनाज-रामवाडी दरम्यान वनाज, आनंदनगर आणि आयडीयल कॉलनी या स्थानकांचे तर पिंपरी-स्वारगेट दरम्यान आठ स्थानकांचे काम सुरू आहे. या मार्गावर पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान पाच किलोमीटरवर मेट्रोची ‘ट्रायल रन’ पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्य सरकार तसेच दोन्ही महापालिकांकडून महामेट्रोला उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. काही किरकोळ समस्यांवर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. पुणेकरांना मेट्रो वेळेपूर्वी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Web Title: Metro December Month