मेट्रो स्थानके व मेट्रोचे डेपो येथे बसविणार सौर पॅनेल

Solar-Panel
Solar-Panel

पुणे - मेट्रो स्थानके व मेट्रोचे डेपो येथे मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल बसविण्यात येणार असून, त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. मेट्रोच्या उन्नत मार्गावर साचलेले पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाद्वारे जमिनीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

मेट्रोचा ट्रॅक धुण्यासाठी ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लाँटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत करण्यात येईल, असे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.

त्याव्यतिरिक्त मेट्रो स्थानके व इतर ठिकाणी बायोडायजेस्टर लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे पाण्याची बचत होणार आहे. 

मेट्रोने आतापर्यंत तळजाई, आकुर्डी इको पार्क, सहयोग केंद्र, आकुर्डी मेट्रो इको पार्क, खराडी एफएस नं. ७४, आर्मी कॅम्पस, पिंपळे निलख, डेक्कन कॉलेज कॅम्पस या ठिकाणी १४ हजार ६४५ झाडे लावली आहेत. मेट्रो कामात एक हजार ६८१ झाडांचे कासारवाडी एसटीपीस, फॉरेस्ट ए. आर. ए. आय., डॉ. सलीम अली बर्ड सेंचुरी, नगर रोड साइड, डेक्कन एम्ब्रॉआयरी, रेंज हिल, केईएस गुरुकुल, पी. डब्लू.डी. ऑफिस, येरवडा ओपन जेल, बंडगार्डन, पीएमसी बंडगार्डन, नगर रोड, आरे डेरी बस स्थानकाजवळ, आळंदी एमएसआरटीएस बस डेपो, कृषी महाविद्यालय, रेंजहील, वनाज कचरा डेपो येथे पुनर्रोपण केले आहे. असे महामेट्रोने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com