esakal | एकाच खांबावर मेट्रो, उड्डाण पूल

बोलून बातमी शोधा

Mahametro

खर्च कमी होईल
या प्रकल्पात उड्डाण पूल आणि मेट्रो ट्रॅक एका खांबावर बांधला जाणार असल्याने खर्च कमी होईल. तसेच, रस्त्यावरील ताण कमी होईल. त्यामुळे येत्या काळात मुंबई-नागपूरच्या धर्तीवर पुणे-शिरूर टप्प्यात उपलब्ध रस्त्याचे रुंदीकरण व गर्दीच्या ठिकाणी उड्डाण पूल व त्याच्यावर मेट्रो, असे चित्र नगर रस्त्यावर पाहावयास मिळाल्यास नवल वाटायला नको.

एकाच खांबावर मेट्रो, उड्डाण पूल
sakal_logo
By
शरद पाबळे

केसनंद - पुणे-नगर रस्त्यावरील सतत वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-शिरूर टप्प्यात उपाय योजण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर एकाच खांबावर मेट्रो व उड्डाण पुलाची उभारणी शक्‍य आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगर, औरंगाबादसह विदर्भ, मराठवाड्याकडे जाणारी हजारो वाहने रोज पुणे-नगर रस्त्यावरून जातात. वेगाने वाढणारा रहिवासी भाग, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापने, शोरूम, सिनेमा हॉल, मॉल या रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाढत्या कोंडीवर ठोस उपाय योजण्यासाठी पुणे- शिरूर टप्प्यात हमरस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी वळणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाण पूलही गरजेचा आहे.

पुणे : सुलज्जा मोटवानी, कटारांना 'प्राइड ऑफ बीएमसीसी'

तसेच केसनंद, सणसवाडी, रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात कामगारांची वाहतूक करणाऱ्या हजारो बस आणि शाळा. महाविद्यालयांच्या बसमुळे कोंडी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी सध्या वनाज ते रामवाडीपर्यंत काम सुरू असलेली मेट्रोसेवा येत्या काळात रांजणगावपर्यंत वाढविण्याचाही निर्धार लोकप्रतिनिधींनी केला आहे. याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांनी पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह चर्चा, पाहणी व पडताळणी सुरू केली आहे. नगर रस्त्याचे रुंदीकरण, उडाण पूल व मेट्रो सुविधेसाठी लागणारी जागा याला मर्यादा आहेत. त्यामुळे पुणे-नगर हमरस्त्याचे सहापदरीकरण व त्यावर वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी उड्डाण पूल आणि त्याच्यावरून मेट्रो नेणे शक्‍य आहे. असे प्रयोग मुंबई व नागपूरसारख्या मोठ्या शहरांत यशस्वी ठरल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.