esakal | पिंपरीत मेट्रोच्या कामाला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

metro work pimpri

संत तुकारामनगर स्थानक या मेट्रोच्या पहिल्या स्थानकाच्या दोन्ही टप्प्यांतील आर्म्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्थानकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे.

पिंपरीत मेट्रोच्या कामाला वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - संत तुकारामनगर स्थानक या मेट्रोच्या पहिल्या स्थानकाच्या दोन्ही टप्प्यांतील आर्म्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्थानकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन स्थानकांदरम्यान वर्षअखेरीला ३१ डिसेंबर रोजी मेट्रो धावणार असून, त्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याकडे महामेट्रोने लक्ष  केंद्रित केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात, ‘पुण्यात डिसेंबरअखेरपर्यंत बारा किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू होईल,’ असे जाहीर केले होते. त्या आश्‍वासनाच्या पूर्ततेसाठी पिंपरी-चिंचवड, तसेच पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला. पौड रस्त्यावरील आनंदनगर ते कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय यादरम्यान मेट्रोचा प्रारंभ पुढील वर्षी मार्चमध्ये होण्याची शक्‍यता आहे. 

संत तुकारामनगर स्थानक हे पुणे मेट्रोचे पूर्ण होणारे पहिले स्थानक ठरणार आहे. प्रत्येक स्थानकावर पहिला टप्पा हा कॉर्नकोर्स लेव्हलचा असेल आणि दुसरा टप्पा हा मेट्रो रेल्वेचा प्लॅटफॉर्म असेल. प्रत्येक टप्प्यासाठी दहा खांबांवर दोन्ही बाजूला आर्म्स बसविण्यात येतात. संत तुकारामनगर स्थानकाच्या दोन्ही टप्प्यांचे वीस आर्म्स बसविण्यात आले असून, त्याच्या कॉर्नकोर्स लेव्हलवरील गर्डर बसविण्यास प्रारंभ झाला आहे.

loading image
go to top