
पुणे : १८ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ५२ अनिवासी गाळे आणि २८ कार्यालयीन गाळ्यांचे ई-लिलाव पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी www.eauction.mhada.gov.in व www.mhada.gov.in संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले.