

MHT CET 2027 Latest News CET Cell Warns Against Fake Exam Date Claims and Takes Legal Action Against YouTube Channel
sakal
पुणे : सामाईक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी कक्षाने स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ स्थापन केला आहे. दरम्यान, एमएचटी-सीईटी २०२७ च्या परीक्षांच्या तारखांबाबत चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी एका यूट्यूब चॅनेलला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.