esakal | मिबा ड्राइव्हटेक कंपनीकडून साकोरे कुटुंबाला १३ लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

मिबा ड्राइव्हटेक कंपनीकडून साकोरे कुटुंबाला १३ लाखांची मदत

मिबा ड्राइव्हटेक कंपनीकडून साकोरे कुटुंबाला १३ लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर: कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या केंदूर (ता. शिरूर) येथील आनंदा साकोरे या कामगाराच्या कुटुंबाला सुमारे १३ लाखांची मदत कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील मिबा ड्राइव्हटेक इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या एमरजन्सी फंडातून दिली.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

डिसेंबर २०२० मध्ये साकोरे हे कंपनीच्या स्टोअर्स विभागात रुजू झाले झाले होते. काही दिवसांतच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या उपचारार्थ कंपनीतील कामगार, अधिकारी, कामगार संघटना प्रतिनिधींनी २ लाख ३० हजार रुपयांची मदत गोळा करून दवाखान्यात भरली. मात्र पुढील काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर साकोरे यांच्या कुटुंबाला मदत व्हावी, अशी भूमिका घेऊन कामगारांनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार एमरजन्सी फंडातून १२ लाख ८७ हजाराची मदत साकोरे यांच्या पत्नी मंगल साकोरे, वडील रामचंद्र साकोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश बर्वे, जितेंद्र चौधरी, अरुण आहेर, शरद आहेर, मेंटेनन्स व्यवस्थापक पोपट ढवळे उपस्थित होते.

loading image
go to top