Baramati News : मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्डच्या मदतीने बारामतीत सुरु होतेय नवीन कृषीपर्व

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषीविषयक संस्था अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अटल इनक्युबशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.
microsoft and oxford university
microsoft and oxford universitysakal
Summary

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषीविषयक संस्था अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अटल इनक्युबशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.

बारामती - कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शाश्वत शेती करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची जोड देत, शेतक-यांच्या विविध अडचणींवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जगप्रसिध्द संगणक प्रणाली विकसीत करणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी, जगातील सर्वोत्तम समजल्या जाणा-या विद्यापीठांपैकी एक ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषीविषयक संस्था अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अटल इनक्युबशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर चंद्रा, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. 3) या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. याच बरोबर कृषिक 2023 या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटनही या प्रसंगी होणार आहे.

कृषिक या आंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शनामध्ये मायक्रोसॉफ्ट मार्फत बारामती येथे उभारण्यात येणा-या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज या कृषि संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिके शेतकरी, उद्योजकांना पाहायला मिळतील.

कृषिक या आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनामध्ये 170 एकरांवर बी-बियाणे, खते, पिकिड व रोग नियंत्रण या आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

शेतक-यांना आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, व्हर्टिकल फार्मिंग, अर्बन फार्मिंग, रोबोटचा शेतीतील वापर, दुग्ध व फळप्रक्रीया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी उपाययोजना, दुध व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन, नैसर्गिक शेती अशा नवीन बाबी या प्रदर्शनात पाहायला मिळतील.

शेतक-यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले असेल. 3 ते 18 जानेवारी दरम्यान स्टार्टअप इतर नवसंशोधक असतील त्यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन केलेले आहे. वरील सर्व विषयांच्या प्रशिक्षणाचा लाभही शेतक-यांना भविष्यात घेता येईल.

मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्डमुळे नवीन पर्वाला प्रारंभ....

  • बिल गेट्स यांच्या संकल्पनेतून मायकोसॉफ्ट कंपनीने बारामतीत कृषि क्षेत्रावर आधारित संशोधन प्रकल्प विकसित करण्याचे पाउल उचलले आहे. प्रोजेक्ट Farmvibes.ai हा मायक्रोसॉफ्ट रिसर्च मधील शेती केंद्रीत तंत्रज्ञानाचा एक नवीन संच आहे.

  • मायकोसॉफ्टने अलिकडेच ही साधने सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. जेणेकरून संशोधन, डेटा शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी यांना कृषी क्षेत्रातील माहितीमध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते.

  • या प्रकल्पातील मशीन लर्निंग अल्गोरिदम तंत्राव्दारे जमिनीची सुपीकता वाढवणे, उत्पादन वाढ करणे, पीक पध्दती नियोजन करणे, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्ता वाढ करणे आणि त्या मागील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • Microsoft Azure या प्लॅटफॉर्मवर चालणारे Farmvibes.ai अल्गोरिदम, जमिनीतील सेन्सर्स, आकाशातील ड्रोन आणि अवकाशातील उपग्रह यांच्यामार्फत माहिती गोळा करुन "भविष्यातील अत्याधुनिक शेती" तयार कण्यासाठी जगभरातील विविध घटकाला सक्षम करु शकतात.

  • या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्याच्या शेतात योग्य प्रमाणात खत पाणी व्यवस्थापन आणि तणनाशक वापरु शकतो आणि त्याच्या शेतातील तापमान आणि वा-याच्या वेगाचा व पावसाचा अंदाज लावू शकतो.

  • याव्दारे त्याच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकतो. विशेषतः Farmvibes.ai मधील नाविण्यपुर्ण संशोधनासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यातील काही प्रात्यक्षिके 3 जानेवारीला दाखविण्यात येतील.

बदलते हवामान, शेतीसाठी वाढलेला खर्च, अत्यल्प उत्पन्नामुळे न परवडणारी शेती...अशा कारणांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करणे ही आता शेतक-यांची गरज आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड़ दिली तर शेती अधिक किफायतशीर होईल, यात शंका नाही. लहरी हवामानाचा फटका बसू नये व तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटाची अगोदर माहिती मिळून त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, उपग्रहाच्या माध्यमातून माहितीचे संकलन, ड्रोन किंवा रोबोट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती अधिक विकसीत करणे ही काळाची गरज आहे. भारतात मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्डच्या मदतीने ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्डचे डॉ. अजित जावकर व मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्रा यांचे यात मोलाचे योगदान आहे. बारामतीत सुरु होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील केवळ दुसरे संशोधन केंद्र ठरणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रा साठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदला जाईल.

- नीलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com